६/१२/२०१४

मोझिलाचे बजेट फोन लवकरच बाजारात, अवघ्या १५०० रुपयात स्मार्टफोन


मंबई : सर्वसामान्य भारतीय मोबाईल चाहत्यांसाठी मोझिला कंपनी परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन बाजारात आणते आहे. अवघ्या 1500 हे स्मार्टफोन भारतासह इंडोनेशियामध्ये उपलब्ध करुन देण्याचा मोझिलाचा मानस आहे.

स्मार्टफोनने आबालवृद्धांना अक्षरश: वेड लावलं आहे. स्मार्टफोनवरच्या विविध गेम आणि फीचरमुळे लोक तहानभूक झोप विसरून स्मार्टफोनला बिलगून बसलेले दिसतात. पण सर्वांनाच महागडे स्मार्टफोन परवडत नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मोझिला आता अवघ्या 1500 रुपयात स्मार्टफोनची विक्री करणार आहे.

भारतात आणि इंडोनेशियातील बाजारपेठेत मोझिलाचे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मोझिलामधील फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टिम एचटीएमएल-5 स्टँडर्डचा वापर करते. एचटीएमएल5वर वेब सेवा आधारित आहेत. त्यामुळेच वेब प्रोग्रामिंगचे ज्ञान असणाऱ्या कुणालाही फायरफॉक्स ओएस अॅप्सची निर्मिती करता येईल.

फायरफॉक्स ब्राऊझरची निर्मिती करणाऱ्या कंपनीने कमी किंमतीत चीप बनवणाऱ्या स्प्रेडट्रम कंपनीशी भागीदारी केली आहे. मोझिला स्मार्टफोन्स मागील वर्षी जुलै महिन्यात लाँच करण्यात आले होते आणि आता ते जगभरातली पंधरा देशांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीने चार हँडसेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी सहकार्य करार केला आहे. त्यात झेडटीई कॉर्प, एलजी इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त युरोप आणि लॅटिन अमेरिकेत फायरफॉक्सवर आधारित मार्टफोन्सच्या विक्रीसाठी पाच वायरलेस कंपन्यांशीही मोझिलाने भागीदारी केली आहे. अवघ्या 25 डॉलर्स किंमतीच्या स्मार्टफोन्समुळे जगभरातील अधिकअधिक लोक ऑनलाईन सेवांचा लाभ घेतील असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय सुलीवॅन यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search