मुंबई: चार दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या मेट्रो रेल्वेला मुंबईकरांनी डोक्यावर घेतलं. मात्र मेट्रोची काही दुखणी आता समोर येत आहेत. पहिल्या दोन दिवसातच स्मार्ट कार्ड आणि तिकिटाचे टोकन इनव्हॅलिड दाखवत आहेत.
दररोज रांगेत उभे राहून कार्ड घेण्याऐवजी, अनेकांनी स्मार्ट कार्डला पसंती दाखवली. मात्र हे स्मार्ट कार्ड इनव्हॅलिड दाखवत आहेत. त्यामुळे प्रवासी वैतागत आहेत.
एकतर तीन मजले चढून, प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोठ्या रांगेत उभं राहावं लागतं. जेव्हा एन्ट्री करण्याची वेळ येते आणि स्मार्ट कार्ड ‘शो’ केल्यानतंर इनव्हॅलिड दाखवतं, तेव्हा प्रवाशांचा संताप आणखी वाढत आहे.
कार्ड इनव्हॅलिड दाखवल्यामुळे ते कार्ड जवळच असलेल्या ‘कस्टमर केअर’ काऊंटरकडे घेऊन जावं लागतं. मात्र तिथेही मोठी रांग पाहायला मिळते. शिवाय या काऊंटरवर फक्त एक किंवा दोन व्यक्ती कार्ड चेक करून, उपाय सांगत असतो. मात्र ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे.
कस्टमर केअरमध्ये कार्ड चेक करून आणल्यानंतर, पुन्हा एन्ट्रीसाठी रांगेत उभं राहावं लागतं. त्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडत आहे.
त्यामुळे मुंबई मेट्रो व्यवस्थापनाने याबाबतची वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. अन्यथा अवघ्या तीन दिवसांत एक कोटी रुपये मिळवून देणाऱ्या मेट्रोकडे अनेक मुंबईकर पाठ फिरवू शकतात.
टिप्पणी पोस्ट करा