अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएच्या निषेधार्थ पुण्यातील मेडिकल स्टोअर्स मालकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. मेडिकल स्टोअर्सच्या या पवित्र्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे.
पुण्यात सुमारे सात हजार मेडिकल स्टोअर्स आहेत. या स्टोअर्स मालकांनी अचानक बंद पुकारला आहे. त्यामुळे रुग्णांची तारांबळ उडाली आहे.
एफडीएच्या नियमावलीच्या निषेधार्थ मेडिकल स्टोअर्स मालकांनी हा पवित्रा घेतला आहे. डॉक्टरांच्या पावतीशिवाय औषध देण्यावर बंदी, अशी औषधं दिल्यास थेट स्टोअर्सचा परवाना रद्द अशा अटी एफडीएने घातल्या आहेत. त्यामुळे मेडिकल स्टोअर्स नाराज आहेत.
टिप्पणी पोस्ट करा