
मुंबई: मुंबई मेट्रोच्या सफरीचा आनंद आता बालप्रवाशांना मोफत घेता येणार आहे. मुंबई मेट्रोने आज आणि उद्या असे दोन दिवस 12 वर्षाखालील मुलांसाठी मोफत प्रवासाचं आयोजन केलं आहे. या प्रवासात मुलांच्या पालकांना मात्र तिकीट काढावं लागणार आहे.
बालप्रवाशांना हा प्रवास मेट्रोच्या कोणत्याही दोन स्टेशनमध्ये करता येणार आहे. या प्रवासासाठी मुलांना कोणत्याही ओळखपत्राची गरज नसून मुलांची उंची चार फुट असावी अशी अट मुंबई मेट्रोची आहे.
मुंबईतील जागतिक दर्जाच्या 'मेट्रो'चं दर्शन मुलांना घडावं, या उद्देशाने ही सफर आयोजित केल्याचं 'मेट्रोतर्फे सांगण्यात आलं आहे.
दरम्यान मेट्रोच्या तिकिट दरवाढीवर 19 जूनला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मेट्रोच्या तिकीट दरावरुन राज्य सरकार आणि मेट्रो प्रशासनामध्ये वाद सुरु आहे. तसंच सध्या सुरु असलेला 10 रुपयाचा तिकीट दर महिनाभरानंतर वाढण्याचे संकेत मेट्रो प्रशासनानं दिले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा