
मुंबई: संपूर्ण महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची आतूरतेनं वाट पाहत होता, तो मान्सून आज अखेर मुंबईत दाखल झाला. मुंबईच्या बोरीवली, मिरारोड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यासोबतच अंधेरी, कांदिवली, विलेपार्ले याभागातही पावसाने दमदार हजेरी लावली.
दरवर्षी 7 जूनच्या दरम्यान येणाऱ्या मान्सूनने मुंबईकरांना यंदा चांगलीच हुकावणी दिली होती. मात्र उशीरा का होईना मान्सून मुंबईत दाखल झाला. उकाड्याने हैरान झालेल्या या मुंबईकरांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
आता मुंबईनंतर उर्वरीत महाराष्ट्रातही मान्सून केव्हा हजेरी लावेल याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यंदांच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यामुळे बळीराजा कासावीस झाला आहे. मात्र मान्सूनच्या आगमनाने त्याला थोडासातरी दिलासा मिळेल.
टिप्पणी पोस्ट करा