महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर 17 जून रोजी जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी 17 जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची माहिती दिली.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 वीचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 10 वीचे विद्यार्थी निकाल कधी लागणार याकडे चातकासारखी वाट पाहून होते. अखेर आज 10 वीच्या निकालाची तारीख निश्चित झाली आहे.
दहावीचा निकाल दरवर्षी उशिराने लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास उशीर होतो. दहावीच्या परीक्षेला यंदा नवीन अभ्यासक्रमानुसार 17 लाख 28 हजार 368 विद्यार्थी बसले होते. यात 9 लाख 67 हजार 174 विद्यार्थी तर 7 लाख 60 हजार 654 विद्यार्थीनी परीक्षेला बसले होते. जुन्या अभ्यासक्रमानुसार 1 लाख 69 हजार 729 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
निकाल खालील वेबसाईटवर पाहू शकता
शिक्षण मंडळाची वेबसाईट -https://mahahsscboard.maharashtra.gov.in
टिप्पणी पोस्ट करा