ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कसार वडवली परिसरात ठाणे क्राईम ब्रान्चने एका अश्लील पार्टीवर धाड टाकली. क्राईम ब्रान्चच्या कारवाईत 14 मुली तर 16 मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
कसार वडवली परिसरातील जंगलात असलेल्या बंगल्यात ही अश्लील पार्टी सुरु होती. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर बंगल्यात काही तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत सापडले.
दरम्यान, या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. मात्र धाड टाकल्यानंतर पोलिसांना अंमली पदार्थ आढळले नाहीत. पण पार्टीत दारुच्या बाटल्या आणि काही वस्तू पोलिसांना सापडल्या. या पार्टीत तीन परदेशी तरुणींचाही समावेश होता.
टिप्पणी पोस्ट करा