५/२३/२०१४

शिवसेना उपशहरप्रमुख मोहन राऊत प्राणघातक हल्ल्यात ठार; सर्व पक्षांचा 'बदलापूर बंद'


बदलापूर येथील शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवार) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या कात्रप चौक येथील कार्यालयानजीक त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, सर्व पक्षांतर्फे 'बदलापूर बंद' पुकारण्यात आला आहे. 
गोळीबारात मोहन राऊत गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर राऊत यांना उपचारासाठी डोंबिवली येथील एम्स रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत. राऊत यांची पत्नी बदलापूर नगरपालिकेत शिवसेना नगरसेविका आहेत

Ref: Loksatta.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search