ठाणे: बदलापूरचे शिवसेना उपशहरप्रमुख मोहन राऊत यांच्या हत्येप्रकरणी, राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. कथोरे यांच्यासह सहा जणांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
बदलापूरचे शिवसेना उपशहरप्रमुख मोहन राऊत यांची काल दिवसढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राऊत यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पाच गोळ्या लागलेल्या राऊत यांचं निधन झालं.
गोळीबारानंतर संपूर्ण बदलापुरात खळबळ उडाली. हत्येच्या निषेधार्थ काल बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
गेल्या दोन महिन्यात बदलापूरात गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसली आहे.
टिप्पणी पोस्ट करा