सोलापूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्य़ा पराभवाचं चिंतन करण्यासाठी सोलापूर काँग्रेसनं आयोजित केलेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांत आज तुफान हाणामारी झाली. या बैठकीत दोन गटातील वादावादीत काही मुद्यावरून खटके उडाले. या शाब्दिक चकमकीचे बघता बघता हाणामारीत रूपांतर झाले.
या हाणामारीत काँग्रेसचे तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. दोन दिवसापूर्वीच सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष धर्मा भोसले आणि जिल्हाध्यक्ष शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान आज झालेल्य़ा बैठकीला शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी दांडी मारली.
काँग्रेसच्या विभागनिहाय चिंतन बैठकीच्या निर्णयानुसार सोलापूर काँग्रेसने आज चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. शहर कार्यकारिणीत दोन पडल्याचे यापूर्वीच पाहायला मिळाले होते. त्याचाच परिणाम म्हणून आज ही हाणामारी झाल्याची माहिती पुढे येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा