५/२७/२०१४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर




भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात जाऊन पदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यालयात दाखल झाल्यावर मोदींनी सर्वप्रथम महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पार्पणकेले. दरम्यान, संध्याकाळी साडेसहा वाजता मंत्रीमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या भेटीला हैदराबाद हाऊसमध्ये दाखल झाले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर
* राजनाथ सिंह - केंद्रीय गृहमंत्री
* अरूण जेटली - अर्थ, संरक्षण, कंपनी व्यवहार मंत्रालय
* सुषमा स्वराज - परराष्ट्र मंत्री
* सदानंद गौडा - रेल्वे मंत्रालय
* नितीन गडकरी - रस्ते वाहतूक, जहाज बांधणी
* वैंकय्या नायड़ू - शहर विकारस, गृहनिर्माण, संसदीय कामकाज
* गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास, पंचायत राज आणि सांडपाणी व्यवस्था
* अनंत गीते - अवजड उद्योग मंत्री
* कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
* नजमा हेपतुल्ला - अल्पसंख्यांक कल्याण मंत्री
* उमा भारती - जलसंसाधन, गंगा स्वच्छता अभियान
* मनेका गांधी - महिला आणि बालकल्याण मंत्री
* अनंत कुमार - रसायन आणि खत मंत्रालय
* रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण राज्यमंत्री
* रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण मंत्री
* हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
* रविशंकर प्रसाद - कायदा आणि न्याय मंत्री
* प्रकाश जावडेकर - माहिती आणि प्रसारण मंत्रालय
* अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
* राधा मोहन सिंग - कृषी मंत्रालय
* थवर चंद गेहलोट - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
* स्मृती इराणी - मनुष्यबळ विकास मंत्रालय
* डॉ. हर्षवर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
* जुआल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
* किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search