मुंबई: उन्हाच्या चटक्यांपेक्षा घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. याला कारण ठरलं आहे तापमानात वाढलेली कमालीची आर्द्रता.
मुंबईतील कालचा दिवस या मोसमातला सर्वाधिक आर्द्रतेचा ठरला. काल मुंबईच तब्बल 95 टक्के इतक्या सर्वोच्च आर्द्रतेची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत.
मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईतील काल तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यामुळे अचानक वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर हैराण झले आहेत.
यावर उपाय म्हणून मुंबईकरांनी नेहमीप्रमाणे शीतपेयांच्या दुकानावर गर्दी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा