४/२६/२०१४

सत्ता शिवसेनेची, तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेकडे




लोकसभा निवडणुकीत एकमेकासमोर उभ्या ठाकलेल्या शिवसेना-भाजप,मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या ठाणे महापालिकेतील दिग्गजांनी सत्तेसाठी पुन्हा एकदा अजब साटेलोटे केलं. ठाणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेच्या हवाली केल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. 

मनसेचे गटनेते सुधाकर चव्हाण यांनी दाखल केलेल्या सभापती पदाच्या एकमेव उमेदवारी अर्जाला शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी सूचक म्हणून तर, अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे यांनी समर्थन दिल्याने चव्हाण यांची निवड बिनविरोध झाली आहे. 

स्थायी समितीची निवडणूक येत्या २ मे रोजी होणार असल्याने आज अर्ज दखल दाखल करण्याच्या दिवशी सर्वपक्षीय नेते पालिकेत एकवटले. आणि स्थायी समितीच्या सभापती पदावर मनसेच्या चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला. 

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून महायुती आणि आघाडीचे संख्याबळ समसमान आहे. तर ,मनसे आघाडीत सामील असून निवडणूक झाली असती तर चिट्ठी टाकून सभापती निवड करावी लागली असती. 

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search