२/२८/२०१५

कार्बनचा अल्ट्रा लो बजेट स्मार्टफोन डॅझल लाँच, किंमत अवघी 5,490 रुपये


स्मार्टफोन यूझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कार्बन कंपनीने लो-बजेट फोन्सच्या सीरीजमध्ये नवा फोन लाँच केला आहे. टायटेनियम स्मार्टफोन सीरीजमधील डॅझल या फोनची किंमत फक्त 5 हजार 490 रुपये आहे.

कार्बनच्या या फोनचा डिस्प्ले 5 इंच असून फ्रंट कॅम 5 मेगापिक्सल, तर सेल्फी कॅम 2 मेगापिक्सलचा आहे. फोनचा प्रोसेसर 1.2GHz क्वॉर्डकोअरचा असून रॅम 1 जीबीचा आहे. 4.4 कीटकॅट ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. कार्बन डॅझलची इंटर्नल मेमरी 8 जीबी आहे, मात्र ती 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

टायटेनियम डॅझलचं वैशिष्ट्य म्हणजे लाव्हा आयरिस 465 प्रमाणेच हा फोनही 21 भाषांना सपोर्ट करतो. याच जोडीने स्वाईप, स्मार्ट आयसारखे जेस्चर फीचर्सही यात आहेत. स्वाईप फीचरमुळे तुम्ही एका बोटाने स्वाईप करुन गाणं बदलू शकतो. स्मार्ट आय फीचरमुळे तुमच्या डोळ्यांच्या अॅक्टिव्हिटीकडे लक्ष ठेवलं जातं. तुमची नजर स्क्रीनवर दूर झाल्यास आपोआप स्क्रीन ऑफ होते.




संदर्भ:ABP Majha
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search