कोरोना छळ
कितीही नाही म्हटले तरी
हे बाहेर जाणे टळत नाही
बाहेर जाऊन पाहिले तर
सामाज अंतर पाळत नाही
हल्ली तर मना-मनामध्ये
या कोरोनाचाच ढास आहे
अन् सहवाशी संबंधाला ही
आता संशयाचाच वास आहे
म्हणूनच तर माणूस पाहून
माणूस दुर दुर पळतो आहे
काळजी घेणारांनाही कोरोना
मानसिक दृष्ट्या छळतो आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
टिप्पणी पोस्ट करा