लागणारे साहित्य:
२ कप दूध, १२ खजूर, ३ ते ४ काजू, २ हिरवी वेलची, तुम्हाला थंड चालत असल्यास १ कप बर्फाचे तुकडे
कसे तयार कराल:
खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक तुकडे करा. काजूचे बारीक तुकडे करून, हिरव्या वेलचीच्या दाण्यांची पुड करून घ्या. मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या. आता त्यात वेलची पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा मिक्समधून फिरवा. शेवटी बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्समधून फिरवून घ्या. तयार झालेले खजूराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.
संदर्भ: Loksatta
लेखीका : निशा मधुलिका