जेव्हा ती तुझ्या घरी येते
अनोळखी असतात तिच्यासाठी सगळेच
ती सगळ्यांनाच आपलंस करते
तिच्या येण्याने घराला तुझ्या
पुन्हा नव्याने घरपण येते
सुख दुःख सारं तुझं
ती तुझ्यासोबतच वाटुन घेते
आईची मिळाली तुला ममता
बहिणीची मायाही मिळत असते
घरात ही आल्यावर मग
आईबहिणीची भुमिका तिच वठवते
तुझ्याचसाठी ती गंगा बनते
सीता बनुन अग्निपरिक्षाही देते
तुझ्या प्राण हरणा-या यमालाही
सावित्री बनुन माघारी पाठवते
कारण सात फेरे घेताना
चौथ्या फे-याला पुढे येऊन
ती सौभाग्यवती म्हणुन मरावं
म्हणुन पत्नीपणाचं वचन घेते...!
कवी-गणेश साळुंखे...!