सये अजुन आठवते ती रात्र,
चंद्रामाच्या प्रकाशाने लखलखलेली...
त्या गंधाळलेल्या चादंरातीत,
तु जरा नटून सजुन बसलेली...
त्या बंदिस्त अश्या खोलीत,
पसरला होता फुलाचा गंध...
पाहताच समोरी मी तुला,
अन् झालो मी जरासा धुदं...
स्पर्श होताच उरास उराचा,
तुही हरवली होतीस माझ्यात...
अन् ओठाना टेकवता मानेवरती,
मला सामावून घेतली तुझ्यात...
करुनी अजुन जवळ बाहुपाशात,
दोघेही न्हाहूनी गेलो प्रेम नशात...
अन् तूझ्या ओठाचा मधाळ गंध,
पसरला होता माझ्या रगारगात...
त्या चंद्रामाच्या मंद प्रकाशात,
आपण दोघेही किती धुदं झालतो...
अन् प्रेम सागरात पहिल्यादाचं,
एकमेकासवे दुर वाहून गेलतो.....!!
---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.
[दि.09-05-2014]