अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
लेण्याद्री हे जिल्ह्यातच असून येथील श्रीगणेशास ’गिरिजात्मक’ या नावाने संबोधले जाते. येथील मूर्ती इतर स्थानी असलेल्या गणपतींप्रमाणे रेखीव नाही. मंदिरही छोटेखानी आहे.
पुणे-जुन्नर मार्गावर जुन्नरपासून अवघ्या ५-६ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या परिसरात हे स्थान डोंगरावर आहे. हा डोंगर लेण्याद्री डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बौद्धकालीन गुंफा असून या गुफांतच हा गणपती आहे.
मूर्तीच्या दोन्ही बाजूस हनुमान, शंकर अशा काही देवांच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी गुंफा असल्याने मंदिराच्या उजव्या बाजूला डोंगरात कोरून काढलेल्या काही ओवऱ्या आहेत. कुकडी नदी ओलांडल्यानंतर मंदिर डोंगरात असल्याने जवळपास २८३ पायऱ्या चढून वर जावे लागते.
नजिकचे रेल्वे स्टेशन : पुणे
पुणे-जुन्नर अंतर : ९७ कि.मी.
संदर्भ: mr.wikipedia.org,Shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous