९/०७/२०१८

निरोगी राहण्यासाठी सेक्स उपयुक्त


आनंदी जीवनासाठी आपले आरोग्य चांगले असावे हे तर जगजाहीर आहे. पण त्यासाठी सेक्स महत्त्वाचं ठरतं... गोंधळलात का? पण, होय हे खरं आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या एका शोधानुसार सेक्स हा आनंद मिळवून देणारा व्यायामाचा प्रकार आहे. यामुळे सेक्सासाईज करा आणि तंदुरूस्त व्हा हा नवीन कानमंत्र मिळाला आहे.

सेक्स दरम्यान एका मिनिटाला पुरूषाच्या ४.२ तर स्त्रीच्या ३.१ कॅलरीज खर्च होतात. हृदयाची गति तीनपटीने वाढते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

सेक्स विशेषज्ञ विलियम मास्टर आणि वर्जिनिया जॉनसन यांनी स्त्री-पुरुषांच्या २१ जोड्यांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. `लाईव्ह सायन्स` या आरोग्यविषयक वेबसाइटवर त्यांनी हे निष्कर्ष मांडले आहेत. त्या निष्कर्षानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास तसेच मानसिक तणाव दूर होण्यास सेक्सची मदत होते.

सेक्स दरम्यानच्या शाररिक हालचालींमुळे सर्व अवयवांना व्यायाम मिळतो. त्यामुळे सेक्सची मनुष्याचे आरोग्य चांगले ठेवण्यास फार मदत होते. असेही `लाईव्ह सायन्स`च्या अहवालात नमूद केलंय. 

लाईव्ह सायन्सचा हा शोध अहवाल म्हणतो की, रात्री झोपण्यापूर्वी सेक्स केल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवत नाही.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search