९/११/२०१८

खेकडा भरता फ्राय




साहित्य

·       खेकडे 
·       चिरलेले कांदे ३
·       लसूण १५ ते १६ पाकळ्या
·       खोबऱ्याचं वाटण १ वाटी
·       तेल ४ ते ५ चमचे.
·       लाल तिखट ४ चमचे
·       बेसन २ चमचे
·       हळत अर्धा चमचा
·       हिंग अर्धा चमचा
·       मीठ
·       कांद्याची पात
·       कोथिंबीर
·       कोबी
पाककृती

·       प्रथम खेकड्याची वाटी पूर्णपणे काढून ती साफ करून घ्यावी.
·       बाऊलमध्ये खोबऱ्याचं वाटण, लाल तिखट, हळद, बेसन, हिंग, मीठ घालून मिक्स करून घ्यावं.
·       हे मिश्रण खेकड्याच्या वाटीत भरावं.
·       कढईत तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या, चिरलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यावं.
·       नंतर त्यात हिंग, हळद घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा.
·       त्यात भरलेले खेकडे घालावेत.
·       उरलेली पेस्ट आणि पाणी घालून, मिक्स करून त्यावर झाकण ठेवावं.
·       झाकणावर पाणी घालून हे मिश्रण दहा मिनिटं शिजू द्यावं.
·       खेकडे शिजल्यानंतर झाकणावरचं पाणी त्या मिश्रणात ओतून पुन्हा १० मिनिटे शिजू द्यावं.
·       वरून कोथिंबीर, कांद्याची पात आणि कोबी यांची सजावट करून ही डिश सर्व्ह करावी.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : २५ मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
एकूण वेळ : ४५ मिनिटे

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search