११/०५/२०१७

रोज टोमॅटो खा आणि कॅन्सरला दूर ठेवा!


जी व्यक्ती आठवड्यात दहा पेक्षा जास्त टोमॅटो खाते त्या व्यक्तीला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जवळपास 18 टक्क्यांनी कमी असतो. एका संशोधना दरम्यान ही गोष्ट समोर आलीय. 
या निष्कर्षावर पोहचण्यासाठी ब्रिस्टोल विश्वविद्यालय आणि ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाच्या संशोधनकर्त्यांनी प्रोस्टेट कॅन्सरनं पीडित 50 आणि 69 वयोवर्षाच्या 1,806 लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा आणि जीवनशैलीचा अभ्यास केला. याची तुलना 12,005 कॅन्सरमुक्त लोकांशी केली गेली. 
या अभ्यासात प्रोस्टेट कॅन्सरची ‘आहार तालिका’ बनविली गेली. यामध्ये, सेलेनियम, कॅल्शियम आणि यांसारख्या इतर खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला. 
यामध्ये, ज्या लोकांनी या खाद्यपदार्थांचा समावेश आपल्या खाण्यात केला त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी असल्याचं आढळलं. 
टोमॅटो आणि टोमॅटोपासून बनलेली उत्पादनं जसं. ज्यूस किंवा शिजवलेले बीन्स सर्वात अधिक गुणकारी असल्याचं आढळलं. आठवड्यातून 10 भाग खाणाऱ्या पुरुषांमध्ये या रोगाचा धोका 18 टक्के कमी असल्याचं यामध्ये समोर आलं.


Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search