साहित्य
·
६ – ८ लादी
पाव
·
२ मध्यम उकडलेले बटाटे
·
३/४ वाटी डाळिंबाचे दाणे
·
१० ते १२ द्राक्षे
·
३/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
·
१/२ वाटी रोस्टेड मसाला शेंगदाणे
·
बारीक शेव
·
१ १/२ टेस्पून दाबेली मसाला
·
१/२ टिस्पून चाट मसाला
·
२ टिस्पून तेल
·
हळद
·
तिखट
·
हिरवी चटणी
·
चिंचगूळाची चटणी
·
कच्छी दाबेलीचा मसाला
·
२-३ लाल-सुक्या मिरच्या
·
२-३ दालचिनीच्या काड्या
·
३-४ लवंगा
·
१ /२ चमचा धणे
·
१/२ चमचा बडीशेप
·
१/२ चमचा काळीमिरी
·
१ चक्रीफुल
·
१ तमालपत्र
पाककृती
·
बारीक चिरलेल्या कांद्याला थोडा चाट मसाला लावून घ्यावा.
·
प्रत्येक द्राक्षाचे दोन तुकडे करावे.
·
उकडलेले बटाटे सोलून किसून घ्यावेत.
·
कढईत तेल गरम करून त्यात ४-५ चमचे चिंचगूळाचे पाणी घालावे. १ १/२
टेस्पून दाबेली मसाला घालावा. मिश्रण ढवळावे.
·
नंतर किसलेला बटाटा घालावा. चवीनुसार मीठ घालावे.
·
थोडी हळद, तिखट
घालावे. त्यानंतर थोडे पाणी घालून एकजीव करून घ्यावे.
·
चांगले शिजले कि गॅसवरुन खाली उतरावे.
·
एका ताटलीत तयार बटाट्याचे मिश्रण थापून घ्यावे. त्यावर कापलेली
द्राक्षं, डाळींबाचे
दाणे आणि शेंगदाणे आवडीनुसार पसरवावे.
थोडी शेव आणि कोथिंबीर घालून सजावट करावी.
थोडी शेव आणि कोथिंबीर घालून सजावट करावी.
·
आता पावाला काप द्यावा. त्यात एका बाजूला चिंचगूळाची चटणी आणि
दुसर्या बाजूला हिरवी चटणी लावावी. मध्ये बटाट्याचे तयार सारण घालावे. अजून हवे
असल्यास थोडे डाळींबाचे दाणे, रोस्टेड
शेंगदाणे घालावेत आणि कांदा भरावा.
·
तव्यावर १/२ टिस्पून बटर घालून त्यावर दाबेली दोन्ही बाजूंनी भाजून
घ्यावी.
·
नंतर दाबेलीची तिन्ही बाजूची किनार बारीक शेवमध्ये बुडवून गरम गरम
खायला द्यावी.
·
मसाला पाककृती
·
सर्व साहित्य एकत्र करुन कोरडेच भाजावे.
·
थंड करून मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर करावी.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार