गाठायचा सिंधुदुर्ग
हिरवळीतील निसर्ग,
हा सिंधुदुर्गाचा गर्व....
देवगडची कुणकेश्वर काशी, येथे
महाशिवरात्रीला भेट होई शंकराशी
म्हणतात याला कोकणची काशी, स्वर्गातून
आणलीय जशीच्या तशी...
मालवणचा किल्ला सिंधुदुर्ग,अख्य
ा सिंधुदुर्गाचा गर्व
शेकडो वर्षापूर्वी संपले राजेशाही पर्व,
तरी समुद्र्मध्यात आहे हा दुर्ग....
सावंतवाडीची लाकडी खेळणी,
यंत्रयुगातही आहे मुलांसाठी पर्वणी
खेळणी हवी आहेत लाकडी तर ताबडतोप
गाठा सावंतवाडी...
देवगडचा "हापूस",आज बनलाय सर्व
फळांचा "बापूस"
तुम्ही आंबा एकदा खाल्ला पाहून,चार पाच
पेटी मागवाल मागाहून....
सिंधुदुर्गातील मालवणी भाषा,हि ऐकताच
सर्वत्र पिकतो हशा
सिनेमातून गेला तमाशा,आणि नाटकात
आली मालवणी भाषा...
सिंधुदुर्गातील पोखरबावचा गणपती,
पांडवांची होती येथे एक रात्र वस्ती
बारा मास वाहते येथे
पाणी धबा धबा,फुलल्यात येथे त-हेत-
हेच्या बागा...
असेच एक शिरोडा ठिकाण,आहे येथे
मिठाची खाण
अख्या सिंधुदुर्गाला मीठ पुरवते शिरोडा,जणू
मिठाचा राजवाडा...
आच-याचा रामेश्वर, नवसाचा परमेश्वर
बडे बडे श्रीमंत,मानतात यालाच
आपला भगवंत.......
येवा कोकण आपलोच आसा......
एक लाईक आपल्या कोकणासाठी.....
संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous