ऊद्घाटन समारोह
निवडणूका जवळ हेरून
ऊद्घाटन समारंभ केले जातात
मताचा फायदा घेण्यासाठी
श्रेयही लाटून नेले जातात
रखडलेल्या ऊद्घाटनालाही
भलताच वेग दिला जातो
तर नियोजना पुर्वीच कधी
ऊद्घाटन समारोह केला जातो
ऊद्घाटन म्हणजे त्यांच्यासाठी
प्रसिध्दीची रसाळ फोड असते
ऊद्घाटन समारोह करण्यासाठी
पुर्वनियोजित चढा-ओढ असते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
टिप्पणी पोस्ट करा