महिलांच्या शरीरात मासिक पाळीच्या काळात अंडाशय परिपक्व होते त्या काळात सेक्सच्या बाबतीत त्या जास्त कल्पना करतात, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.
लेथब्रिज विश्वविद्यालयाच्या संशोधकांना हे आढळून आले आहे, की एकट्या राहणार्या स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान जेव्हा अंडाशय परिपक्व होते त्या दिवसात इतर दिवसांच्या तुलनेत त्या सेक्सच्या बाबतीत जास्त कल्पना करतात.
संशोधकांनी या अभ्यासाठी 18 ते 30 वर्षादरम्यान 27 स्त्रियांचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान त्यांना आढळून आले, की गर्भ निरोधासाठी त्या कोणत्याही प्रकारच्या हार्मोनल औषधांचे सेवन करीत नव्हत्या तसेच त्यांचे कोणत्याही व्यक्तीशी प्रेमसंबंधही नव्हते. सर्व स्त्रियांना एका महिन्यापर्यंत रोज सेक्सच्या बाबतीत आपल्या कल्पना लिहून काढायच्या होत्या.
एक महिन्यानंतर या स्त्रियांनी लिहिलेल्या डायरीच्या अभ्यासाअंती असे आढळून आले, की मासिक पाळीच्या दरम्यान अंडाशय परिपक्व होते त्या काळात स्त्रिया सर्वात जास्त सेक्सच्या कल्पनांमध्ये रममाण होतात.