नळावर पाणी भरताना हळूच,
तिच्या अंगावर पाणी शिपंडणारा 'तो'...
डोळे मिटून चेहर्यासमोर हात आणत,
'काय रे हे तुझं गप्प ना'असं बोलणारी 'ती'...
अलगद तिचा नाजुक हात पकडून ,
तिला आपल्या जवळ ओढणारा 'तो',
अन् पाण्याच्या कारंज्याखाली,
आज चिबं चिबं भिजलेली वेडी "ती"...
नकळत तिच्या कमरेभोवती हात टाकून,
तिला प्रेमाने विळखा घालणारा "तो",
त्या पहिल्या अश्या मुक्या स्पर्शाने ,
जराशी शहारुन बावरलेली वेडी "ती"...
अलगद तिच्या भिजलेल्या केसाना,
मागे सारुन कानाला चावणारा "तो",
जराशी धुदं होवून वेडी लाजलेली,
त्याच्या मिठीत हरवुन जाणारी "ती"...
आज तिच्या प्रेमात धुदं न्हाऊन
चिबं चिबं भिजलेला वेडा "तो",
अन् सवे आज देहभान हरवून,
मिठीत घेवून साथ देणारी वेडी "ती"...!!