बैचेन माझं मन
तुला बोलण्यासाठी
जादू आहे का तुझी
का आहे प्रेमात मी ...!!
बैचेन माझं मन
तुला भेटण्यासाठी
ओढ आहे का तुझी
का आहे प्रेमात मी ...!!
बैचेन माझं मन
तुझ्या संगतीसाठी
माया आहे का तुझी
का आहे प्रेमात मी ...!!
बैचेन माझं मन
तुझ्या स्पर्शासाठी
किमया आहे का तुझी
का आहे प्रेमात मी ...!!
बैचेन माझं मन
तुला ओठासाठी
गोडी आहे का तुझी
का आहे प्रेमात मी ...!!
बैचेन माझं मन
तुझ्या हसण्यासाठी
विनोद आहे का तुझा
का आहे प्रेमात मी ...!!