कसला हो हिन्दुस्थान
उगाच आरडा ओरड
दिसे ना मला हिंदुत्व
सर्व वर्चस्वाची होड़
जग कुठे संपन्न होता
नवं शोधत आहे
भारत जाती धर्माचेच
ढोल पीटत आहे
काय हवं जगायला
अन्न की रक्त कुणाचं
रोज सालं तेच ते
तू हिन्दू तू
मुस्लिमाचं
धर्म म्हणून काय तर
जातितही शांती नाही
जगायला म्हणून इथे
सारखं आरक्षण नाही
मारून टाका एकमेकांना
उगा भांडण कशाला
कुत्र्यांसारखं
जागेचा हट्ट
पूरल पैसा मसनाला
---------------/**--
📓 शशिकांत शांडिले
भ्र. ९९७५९९५४५०