का कळेना तुला हे माझ्या मनाचे कोडे
आठवतो दिनभर आठवणी तुझ्या,
घालवतो दिवस सारा एकांतात माझ्या...
पाहतो गं सतत तुझी कवडशात छाया,
खरंच आहे गं तुझ्यावरी प्रेमळ माझी माया
तुडवताना पायाखाली मुक्त चाफ्यांची रास,
गुदमरतो तुझ्याविना गं माझा मोकळा श्वास
नको गं तु जाऊ मला अलगद करुन,
घे हातात हात तुझ्या घट्ट माझा धरुन
स्पर्श तुझा वाटेल गं अबोला माझ्या मनाला,
आपल्या प्रेमाचि गोडी सांगुन जाईल तुझ्या कानाला