स्वप्न तर सर्वांनाच पडतात,
पण माझ्या स्वप्नातील ती,
काही वेगळीच आहे.....
प्रेम तर सगळेच करतात,
पण माझ्यावर प्रेम करणारी ती,
काही वेगळीच आहे.....
हातात हात तर सगळेच देतात,
पण मला हात देऊन सावरणारी ती,
काही वेगळीच आहे.....
मांडीवर डोके तर सर्वच ठेवतात,
पण प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणारीती,
काही वेगळीच आहे.....
मिठीत तर सगळेच येतात,
पण मिस करते म्हणून मिठीत रडणारी,
ती काही वेगळीच आहे.....
रागवायला तर सर्वच रागावतात,
पण माझ्यावर रागावून प्रेमाने जवळ घेणारी
ती,
काही वेगळीच आहे.....
प्रेमात तर सगळेच झुरतात,
पण माझ्यासाठी झुरणारी ती,
काही वेगळीच आहे.....
प्रेमात जीव तर सर्वच देतात,
पण माझ्यावर जीव टाकणारी ती,
काही वेगळीच आहे.....