बोलायला न ऐकणारी
अन् बोललोच काही रागाने
तर एका बुक्कीत दात पाडेन म्हणणारी
खरच एक मैत्रिण तिच्या सारखी असावी.......
मनमोकळी तर इतकं बोलते
कि क्षणात वातावरण खुप मस्त करते,
कधीकधी जास्तीचं आगाऊही बोलते
पण ते मला हसवण्यासाठीच असते
खरच एक मैत्रिण तिच्यासारखी असावी.....
तिच्या स्वभावाची अन् मनाची निरागसता इतकी भासावी
कि पाण्यालाही ती त्याच्याहून निर्मळ वाटावी,
भेटलीच नाही ती खुप दिवस तर
कधीची भेटतेय असं होऊन जाते
अन् जेव्हा कधी ती भेटेल तेव्हा मात्र
माझी खट्ट्याळ बोलून खुप खेचते
खरच एक मैत्रिण तिच्यासारखी असावी......
तिच्यासारखी असावी...........
मयुर जाधव