"आज कि ताजा खबर"( Indian media) आणि TV वरच्या मालिका आता एक सारख्या वाटायला लागल्या आहेत, तोच आरडा-ओरडा, तमाशा, news सांगतात कि आमच्या वर उपकार करतात.
हीन दर्जा, आणि काही वेळा तथ्य हीन , TRP साठी सगळ केलेलं सोंग. कधी कधी दया येते तुमच्यावर विशेष करून TV news channels वर, जबरदस्त आत्मविश्वास आणि जोश, तोंडाचा पट्टा सतत सुरु आणि करताहेत काय TV मालिका सारखे dialog बोलतात आणि आम्ही देशाच किती भल करतोय अशी बाष्फळ भावना!
"तमाश्या" हा शब्द योग्य आहे तुमच्या साठी, मी ३० मिनिटे एखाद news channel बाहील तर बातमी सांगण्याचा वेळ ७ ते १० मिनिटे आणि बाकी काय जाहिराती!! तुमचे असे उपकार नकोत आम्हाला!!!