केले फक्त तुझ्यावरच
तीच्यासोबतची ती पहिली भेट...
मला आजही आठवते
ती बसली होती बाजुला
मला ते स्वप्नच वाटत होते...
बोलायच होत बरच काही
पण शब्दच फुटत नव्हते..
माझ्या मनात ती बोलेल
तीच्या मनात मी बोलेन
आधी बोलायच कुणी
मग मीच सुरूवात केली..
गप्पांची मैफील सुरू झाली
ती बोलण्यात दंग होती
आणि मी तीला पाहण्यात..
तीचे ते मधेच स्मित हासणे
हळूच डोळ्यावरील केस मागे घेणे
सर्व काही अविस्मरणीय होत...
माझ्या कल्पनेच्या पलीकडल होत
ती मला काही सांगत होती
हेच मला उमजत नव्हत
जणु मला भानच नव्हत..
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous