सावंतवाडी - गोवा रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलंय.
लवकरच, संसदेत रेल्वे बजेट 2015-16 सादर होणार आहे. त्याआधीच, रेल्वेमंत्र्यांनी कोकणवासियांना हे एक बहुप्रतिक्षित गिफ्ट दिलंय.
सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पसेंजर टर्मिनसचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल यांनी दिलीय. कोकण रेल्वेच्या डबल ट्रॅकचा मुद्दा विचारात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. शिवाय, सर्व रेल्वे लाईन्स इलेक्ट्रिक आणि पर्यायानं सोयीच्या होणार आहेत.
सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ही महत्त्वपूर्ण घोषणा मानली जातेय. कोकणचे सुपुत्र असलेल्या सुरेश प्रभू यांनी नुकताच कोकणचा दौरा केला होता. त्यावेळी, त्यांच्यासमोर कोकणवासियांनी आपलं म्हणणं मांडलं होतं.
तर रेल्वे टर्मिनसवरुण राणे-केसकर वाद रंगला होता. हा वाद सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला मंजुरी मिळाल्यानं केसरकर यांनी जिंकल्याचं चित्र आहे. तर लाखो प्रवाशांच्यादृष्टीनं रेल्वेच्या डबल ट्रॅकचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय.