सॅमसंगने स्मार्टफोन गॅलक्सी A7 भारतात नुकताच लाँच केला आहे. सध्या तरी हा स्मार्टफोन कंपनीच्या ई-स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 30,499 रु. निश्चित करण्यात आली आहे.
स्मार्टफोन A7 हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम फोन आहे. 6.3 मिमी एवढी जाडी असलेला हा स्मार्टफोन आहे. गॅलक्सी A7 चा डिस्पले 5 इंच असून पिक्सल रेझ्युलेशन 1080 x 1920 आहे. 64 बिट ऑक्टोकोअर क्वॉल कॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसर असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 2 जीब रॅम आहे.
13 मेगापिक्सल ऑटोफोकस कॅमेरासह 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही आहे. सॅमसंगने या कॅमेऱ्यामध्ये खास वेगळे फीचर आणले आहेत. वाइल्ड सेल्फी, रिअर कॅम सेल्फी ब्यूटी फेस यासाऱखे नवनवे फीचर आहेत.
याची इंटरनल मेमरी 16 जीबी असून 64 जीबीपर्यत मेमरी क्षमता वाढविता येऊ शकते. हा स्मार्टफोन 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोड, चेंज थीम, प्रायव्हेट मोड आणि मल्टी स्क्रीन यासरखे फीचर यात आहेत.
वाय-फाय, 4जी जीपीएस, एनएफसी यासारख्या सुविधाही यात आहेत. 2600 mAh एवढी त्याची बॅटरी क्षमता आहे.
हा स्मार्टफोन अदयाप तरी फक्त पांढऱ्या रंगामध्येच उपलब्ध आहे. लवकरच हा स्मार्टफोन काळ्या आणि सोनेरी रंगामध्ये भारतात उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.