तु विसरू शकशील का?
भेटण्यासाठी पाहीलेली वाट
अश्रुंचे खळखळणार...े पाट
ह्रुद्यात ओथंबणारे प्रेम
ओठांवरून अलगद टिपलेला थेंब
तु विसरू शकशील का?
तो रुसवा तो फ़ुगवा
तो सहवास हवाहवा
डोळ्यांतील ति व्याकुळता
ति श्वासांची अधिरता
तु विसरू शकशील का?
एकमेकांसाठी भांडलो सर्वांसोबत
घेतली शप्पथ राहु सोबत
आठवायची काय गरज आहे मला
मी तर नेहमी तुझ्या राहणार आहे
शरीरापर्यंत कधीच पोहोचायच् न्हवतं मला
पोहोचायच होतं मनाच्या खोल गाभारयात
तिथे तर केव्हांच पोहोचलोय मी
दिवस सरतील तसा होईनही धुसर आणी अस्पष्ठ मी
तरीही राहीन सुप्तावस्थेत पुन्हा एखदा अंकूरण्यासाठी
लागतील काही जन्म
उलटतील काही जन्म
पण मी तर् तुझाच आहे
प्रत्येक जन्मासाठी!!!!!