२/०६/२०१५

तिचं भांडण





छोट्या  छोट्या 


कारणावरून

तिला  भांडल्याशिवाय
करमत  नाही

भांङून  पुन्हा
परत  तिला
बोलल्याशिवाय  
करमत  नाही

दोन  चार  दिवसाला
तिचं  भांडण 
ठरलेलं  असतं

रुसून  पुन्हा
तिचं  हसणं
ठरलेलं  असतं 

भांडल्यावर  कोण
पहिल्यांदा  बोलतो
असा  यक्षप्रश्न
आमच्यापुढे   आसतो

ताटाखालचं   मांजर
होणार   नाही
गुलामगिरी   तिची
सहन  करणार  नाही

म्हणते  ती  स्वतःला
पाणी  लावणार   नाही
मीच  का  बोलावं
आता  जमणार  नाही

बाळ   आमचं  पडतं
अचानक च    रडतं
विसरतो  भांडण
मन  आमचं  जुळतं............

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search