तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसली तर मला करमत नाही,
दिव्याच्या वातीने जळतो तो पतंग,
तरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही,
तसच तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसलीस की मला करमत नाही
एक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस
मला दिवस वाटत नाही
माझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे
का तुला दिसत नाही,
सवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते
जगण जगणंच वाटत नाही.