२/१४/२०१५

का कुणास ठावूक



का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।
मी समोर दिसलो की
मुद्दाम दूसरी कड़े वळ ते।
का कुणास ठावूक


हसुनी तुझ ते माझ्याशी बोलन
किती ग छान असायच।
असताना माझ्या सोबत
तुला तुझच भान नसायच।
भान ही आता तुझे 
तुला आहे कळ ते।
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

दिवसभर वाजणारा फ़ोन
तुझेच नाव दाखवायचा।
inbox ओपन करून पहिला की
तुझाच msg असायचा।
फ़ोन ही आता असून
नसल्याचे भासते
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

तू जरा सोबत असली की
जग माझ्या मुठीत असायच।
नात हे जणू आपलं
बंद एका गाठित असायचं।
नात्याची ही गाठ आता
सैल झाल्याचे वाटते।
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

तुझ्या आठवांचा डोंगर
इतका उंच झालाय।
आले कित्येक वादळी
पण अजुन नहीं हाल लाय।
आठव हा तुझा येता
अश्रु डोळ्या तुनी वाहते।
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search