२/१९/२०१५

काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो….



काल पर्यंत मी तुझ्या सोबतच
होतो….
आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ….
आणि नंतरही मी तुझ्या सोबतच
राहील ….
उन्ह्याळ्यात तुझी तहान बनून,
पावसाळ्यात ढगांतून
पडणार्या पाण्यात मी असेन,
आणि हिवाळ्यात थंडी बनून
मी तुझ्या सोबत असेन…
उजेडात तुझी सावली बनून,
तर अंधारातल्या काळोखात
मी असेल,
आणि एकटेपणात
तुझ्या मनातला विचार बनून
मी तुझ्या सोबत असेन…
हसताना तुझ्या गालावरची खळी बनून….
रडताना तुझ्या प्रत्येक अश्रूत मीच
असेन…
आणि रागावशील तेव्हा लाल रंग
बनून तुझ्या डोळ्यांत मीच असेन ….
बोलताना तुझ्या आवाजात,
तर लिहिताना तुझ्या प्रत्येक
शब्दात मी असेन,
आणि नेहमीच तुझा श्वास बनून
….मी तुझ्या सोबत असेन ….
तुझ्या तळ हातांच्या रेषांत,
tension मध्ये कपाळाच्या आटयात
….
आणि तू गुनगुनत
असलेल्या त्या प्रत्येक गाण्यात
…. मी तुझ्या सोबतच असेन ….
तुझ्या बंद डोळ्यांतल्या स्वप्नात …
उघड्या डोळ्यातली आशा बनून ….
आणि मनातली इच्छा बनून
मी तुझ्या सोबतच असेन …
तुझ्या ट्या प्रत्येक
प्रश्नाच्या उत्तरात ….
तू विसरलेल्या त्या प्रत्येक
आठवणीत ….
आणि तुझ्या प्रत्येक प्रवासात
तुझी …”Destination” बनून
मी तुझ्या सोबत असेन ….
काल पर्यंत मी तुझ्या सोबतच
होतो….
आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ….
आणि नंतरही मी तुझ्या सोबतच
राहील

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search