२/२०/२०१५

आसूसचा जबरदस्त जेनफोन -२, फ्रंट कॅमेरा ५ मेगाफिक्सल




तायवानची कंपनी आसूस लवकरच नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. 'आसूस जेनफोन २' हा लाँच करण्यासाठी हालचाल सुरु केली आहे.
या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे ४ जीबी रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये पहिल्यांदाच ४ जीबी रॅमचा फोन येत आहे. जगातील हा पहिलाच असा स्मार्टफोन असणार आहे. तसेच कंपनी या आसूस फोन प्रमाणे आणखी नवा फोन बाजारात आणणार आहे, अशी माहिती हाती आलेय.
आसूस जेनपोन -२ हा ५.५ इंटचा डिस्प्ले, २.३ हर्ट्स क्वाडकोर प्रोसेसर, ४ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी. ४,४ किटकॅट ओएस सिस्टीम. तसेच अॅड्राईड लॉलीपॉपने किटकॅट सिस्टीम अपडेट होईल.
या फोनमध्ये १३ मेगा पिक्सल कॅमेरा तर ५ मेगाफिक्सेल फ्रंट कमेरा असणार आहे. ३,००० एमएएच बॅटरी, ४जी, ३ जी, वायफाय आदी सुविधा या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. ५ रंगात हा फोन उपलब्ध होईल. मात्र, या फोनची किंमत अजूनही गुलदस्तात आहे.






Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search