मायक्रोमॅक्सने कॅनव्हास सीरिजमध्ये आणखी एक शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनचं नाव कॅनव्हास पेप (Canvas Pep) असून त्याची किंमत 5,999 रुपये आहे.
कंपनीच्या माहितीनुसार नवा स्मार्टफोन ऑनलाईन आणि बाजारात उपलब्ध स्टोअरमधून खरेदी करु शकतो. पण कॅनव्हास पेप अजून कंपनीच्या वेबसाईटवर लिस्टेड झालेला नाही.
कॅनव्हास पेपचे खास फीचर्स
- मायक्रोमॅक्सच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 4.4.2 किटकॅट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम आहे. तो 5.0 लॉलीपॉप अँड्रॉईडने अपडेट केला जाऊ शकतो.
- फोनमध्ये 480x854 पिक्सेलची 4.5 इंच स्क्रीन आहे.
- या स्मार्टफोनमध्ये 1.3 गिगाहर्त्झ क्वॉडकोर प्रोसेसर आहे.
- फोनमध्ये 1 GB रॅम आहे.
- मायक्रो एसडी कार्डच्या सपोर्टने फोनची मेमरी 32 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
- या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 1.3 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
फोनच्या कनेक्टिव्हिटी फीचर्सबाबत बोलायचं झालं तर कॅनव्हास पेप स्मार्टफोनमध्ये 3G, GPRS/ EDGE, Wi-Fi 802.11 b/g/n, मायक्रो-यूएसबी आणि ब्लूटूथ सारखे आवश्यक फीचर्स आहेत.
पण मायक्रोमॅक्सने फोनच्या इंटरनल मेमरीचा खुलासा अद्याप केला नाही. फोनची बॅटरी 1700mAh असून ती 210 तास स्टँडबाय राहू शकते. सध्या हा फोन पांढऱ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास पेपचे फीचर्स हे मागील आठवड्यात लॉन्च झालेल्या बोल्ट A82शी मिळते-जुळते आहेत. पण बोल्टमध्ये 1800mAh ची बॅटरी आणि 512 MB रॅम आहे.