स्मार्टफोनमध्ये गेम खेळणं, इंटरनेशटशी संबंधित विविध कामं करता येतातच. पण स्मार्टफोनद्वारे आता टीव्ही, एसी वगैरे कंट्रोल करणंही शक्य आहे. इंटेन्स कंपनीने असा स्मार्टफोन गॅझेटप्रेमींसाठी आणला आहे.
इंटेक्स मोबाईल्सने नवा ड्यूएल स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्यामध्ये युनिव्हर्सल रिमोट कंट्रोल आहे. यामुळे युझर्स टीव्ही, एसी, सेट टॉप बॉक्स वगैरे नियंत्रित करु शकतात.
इंटेक्स अॅक्वा Y2 रिमोट असं या स्मार्टफोनचं नाव असून त्याची किंमत केवळ 4,390 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक एमटी 6572 ड्यूएल कोअर प्रोसेसर आहे.
इंटेक्स अॅक्वा Y2 रिमोटचे फीचर्स
* स्क्रीन- 4 इंच आयपीएस, 800x480 पिक्सेल
* प्रोसेसर- मीडिया टेक एमटी 6572 ड्यूएल कोअर
* ओएस- अँड्रॉईड किटकॅट 4.4
* रॅम- 512 MB रॅम, 4 GB इंटरनल स्टोअरेज, 32 GB मायक्रोएसडी कार्ड
* कॅमेरा- 5 एमपी रिअर एलईडी फ्लॅशसह, 2 एमपी फ्रण्ट
* इतर फीचर- 3G, 2G, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटुथ
* बॅटरी- 1500 एमएएच
* किंमत- 4,390 रुपये