१२/०३/२०१४

ओठांचे सौंदर्य वाढवा .




ओठ आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. मात्र, बऱ्याचदा आपले ओठ रुक्ष होवून निस्तेज दिसू लागतात. काही घरगुती उपाय केल्यास ओठ आणखी सुंदर दिसतील.
आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी महिला लिपस्टिकचा वापर करतात. मात्र, लिपस्टीकमध्ये असलेल्या केमीकल्समुळे ओठांवर याचा दुष्परीणाम होवून ओठ काळे पडतात.

ओठ फाटलेले आणि सुकलेले असतील तर, आपल्या चेहऱ्याची चमकच निघून जाते. अशा ओठांना कितीही लिप बाम लावला तरी ओठांमध्ये नैसर्गिक चमक दिसत नाही. अशा वेळेस ठोस उपाययोजना करणे गरजेचे असते.

बाजारातील महागड्या लिप स्क्रबरवर पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरीही उत्तम लिप स्क्रबर बनवू शकता. आलं, मध आणि साखर यांचा वापर करुन हे लिप स्क्रबर बनवले जाते.

साखर आणि मध प्रत्येकी एक चमका घ्यावे. यात आल्याचा एक तुकडा बारीक कापून टाकावा हे मिश्रण व्यवस्थीत मिसळुन जेलप्रमाणे नियमित ओठांना लावावे.

हे जेल ओठांना लावल्यावर हलक्या हाताने गोलाकार मसाज करावे. यानंतर काही वेळाने ओठ धुवावेत. यामुळे ओठ अधिक मुलायम होवून चमकदार बनतील.


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search