१२/०५/२०१४

इंटरनेट माध्यमातून घर बसल्या कमवा पैसे



आजच्या जगात इंटरनेट सगळ्यांसाठीच महत्वाची गोष्ट झाली आहे. बाजारातील वाढत्या स्मार्टफोन्सने याला आणखीनच वाव दिला आहे. या सगळ्याबरोबरच इंटरनेटवरून पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्ग आहे. तशी संधी तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न करायला हवा मात्र.
अनेक लोक शिक्षण घेऊन पण बेरोजगार आहेत. अशा लोकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. या संधीमुळे त्यांच्या विचारात भर पडेलच सोबत इतरांनाही ते त्यांचे विचार खूप चांगल्या प्रकारे दुसऱ्यांना पटवून देऊ शकतात.
इंटरनेटवरून पैसे कमवण्याचा हा मार्ग आहे तो म्हणजे 'ब्लॉग' लिहीणे. या ब्लॉगमध्ये तुम्ही तुमचे विचार, शायरी, जोक्स, मुव्ही रिव्ह्यू, टिप्स, जनरल नॉलेजच्या गोष्टी किंवा आणखीनही बरचं काही लिहू शकता. एकदा जर लोक तुमचे ब्लॉग वाचण्यास सुरुवात करतील, तेव्हापासूनच तुमची कमाई चालू होईल.
तुम्ही हे जाणण्यास उत्सुक असाल. ही कमाई होते कशी ? पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्हाला हा ब्लॉग बनवता आला पाहीजे. यासाठी तुमचा गुगल मेल वर ईमेल-आयडी असणे आवश्यक आहे. त्यानंतर  http://www.blogger.com/. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा ब्लॉग बनवता येईल आणि घरबसल्या कमाईचा आनंद घेता येईल. 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search