१२/२२/२०१४

आयुष्यात प्रेम केलं होतं




आयुष्यात प्रेम केलं होतं 
कुणालातरी आपलं आयुष्यच
देऊ केल होतं...

म्हणतात,
प्रेम करणं सोप असतं 
ते व्यक्त करणं कठीण असतं,
प्रेम पहाणं सोप असतं,
ते समजून घेणं कठीण असतं.. आणि हेच समजून घ्यायचं होतं,
म्हणून
आयुष्यात प्रेम केलं होतं,
कुणालातरी आपलं आयुष्यच
देऊ केल होतं


असतो का प्रेमात खरच आनंद का नुसतच "I Love U"
म्हणायच असतं? 
विरहात तिच्या बुडून मरायच असतं
की फक्त "I Miss U" म्हणायच असतं?

हेच बघायच होतं 
म्हणूनच आयुष्यात प्रेम केलं होतं ,
कुणालातरी आपलं
आयुष्यच देऊ केल होतं 
म्हणुनच तिच्याजवळ व्यक्त करणं ठरवल आणि व्यक्तही केल होतं

पण............. . .

तिला "माझ तुझ्यावर प्रेम नाही" 
असं म्हणायला काहीच
वाटल नव्हतं , 
असतात खरच अशी माणसं या जगात हे कधी मी पाहिलं नव्हतं...

झगडत होतो तिच्याकडून ते
'I Love You"
हे तीन शब्द
ऐकण्यासाठी कधी तिच्या आठवणीतं मरत होतो,
तर कधी मरुनच जगत होतो.... आणि कदाचित हेच
माझ्या मनाला अनुभवयाच होतं ..... म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं
होतं,
कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ
केल होतं!!!!!

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search