१२/२४/२०१४

आपली माणस


कसे सांगावे गाऱ्हाणे आपल्याच माणसांचे

कसे द्यावे प्रेम त्यांना आपल्या उरातले

सोबत जुनी आहे, पण जणू अनोळखीच सारे
शब्दांचे वार झेलत आहे
उद्या नवीन दिवस, नवीन सुरुवात
पण आपले मात्र परकेच अन मीहि एकटीच
माझ्या आतला आक्रोश बाहेर पडण्यासही घाबरतोय
दुखावलेल मन कस बस सावरतेय
मी वाईट आहे हे मला पाठ करायला लावलय
माझ प्रेम मात्र कोणालाच नाही कळलंय
माझ पायपुसण झाल्याच आज पहिल्यांदाच जाणवतंय
बघूया कधी या घराला माझ अस्तित्व्य कळतंय


mayur patil @http://manusekemanus.blogspot.in

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search