१२/०८/२०१४

"संभाजी""





१४ मे १६५७ पुरंदरवरं एका "शिवरत्नाचा" जन्मं झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून "माँसाहेब" जिजाऊनी त्यांचं नामकरणं केलं.

बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी सर्वांची मनं हरपू लागली.
वय झाल सव्वा दोन वर्ष आणि त्याच वेळी नियतीनं गलती केली.


संभाजी राजांच्या "मातोश्री सईबाई महाराणी साहेब" यांचं निधनं झालं.
दहिवरचं मातृत्वाचं छत्रं हरपलं.
पिता "शिवाजी राजे" तर सतत पाठीला मरण बांधून मुलुखभर दौड घेणारे, पित्याचीछत्रछाया वाट्याला यावी कशी?

पण! याचवेळी सामन्याला "माँसाहेब" जिजाऊ.
अजून दुसरा "शिवाजी" घडवायचं सामर्थ्य जिजाऊत नक्कीच आहे. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापिठामध्ये "संभाजी" राजांचं शिक्षण चालू झालं. संभाजी राजे "लिहिणं-वाचणं शिकले", "चालणं-बोलणं शिकले", "पळणं-खेळणं शिकले". बघता बघता ना-ना कला, ना-ना विद्या, ना-ना गुण त्यांना आत्मसाद झाले.

एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही तब्बल सोळा-सोळा भाषा संभाजीराजांना यायला लागल्या.
मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कानडी येते,तामिळ येते, मल्ल्याळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृतसुद्धा संभाजीराजांना येतेय.
राज्यशास्त्र, धर्मशास्त्र,नीतिशास्त्र, अर्थशास्त्र,प्रभागशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेज तरबेज झाले.

काव्यगुण सुद्धा त्यांनी जोपासला.
संभाजी राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी "बुधभूषणम्" नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला. 'नकशिका', 'नायिकाभेद', 'सातसतर्क' यांसारखे कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले.
आणि बघता बघता उत्तमं कवी म्हणून "संभाजी राजांचा" नावलौकिक झाला.
बुद्धीचं कार्यक्षेत्र तर काबीज केलंच पण!

त्याचवेळी शरीराचं, शरीरंसंपदेचं, हा संभाजी ना-ना विद्यामध्ये, व्यायामामध्ये तेज तरबेज झाला."मल्लविद्या", "भालाफेक", "तलवारबाजी", "घोडेस्वारी" याच्यामध्ये संभाजी राजांनी मोठी हुकुमत पैदा केली. अरे! घोडेस्वारीमध्ये संभाजी राजांचा हात कोणी धरतं न्हवतं.
तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि गर्रदिशी डोळ्याची पापणी मिटते तोवर फिरवणारा या जगाच्या पाठीवर एकचं योध्दा झाला.
त्या योद्ध्याचं
नाव होतं..

"संभाजी""





Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search