भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अनेक स्मार्टफोनमध्ये अजूनही गूगलची लेटेस्ट अँड्राईड 4.4 किटकॅट ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. अनेक स्मार्टफोन यूजर्स किटकॅट अपग्रेडेशनच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच कानामागून येऊन तिखट झालेल्या मोटोरोलाच्या मोटो जी, मोटो ई आणि मोटो एक्स या तीन बजेट स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अँड्राईड किटकॅटचं 4.4.4 हे अद्ययावत अपडेशन उपलब्ध होणार आहे.
मोटोरोला इंडियाच्या ट्वीटर हँडलवरून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने मोटो जी, मोटो ई आणि मोटो एक्सच्या भारतीय यूजर्सना हे अपडेट उपलब्ध होणार आहे.
गूगलने अँड्राईड 4.4.4 किटकॅट या नव्या अपडेशनमध्ये सुरक्षित ब्राऊसिंगसाठी अतिरिक्त यंत्रणा दिलीय. अलीकडेच मोठा धुमाकूळ घातलेल्या हार्टब्लिड या व्हायरसला प्रतिबंध करणारी यंत्रणा या नव्या अपडेशनमध्ये आहे.
भारतातील मोटो यूजर्सना हे अपडेट अँड्राईड व्हर्जन आपल्या फोनमध्ये डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी अॅप्स मेनूच्या सेटिंग आयकॉनला सिलेक्ट करून अबाऊट फोन हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. त्यानंतर सिस्टीम अपडेट्समध्ये जाऊन तिथे उपलब्ध करून देण्यात आलेला डाऊनलोड हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. अँड्राईड 4.4.4 किटकॅटचं नवीन अपडेट तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करा... हे अपडेट इन्स्टॉल झाल्यानंतर फोन आपोआपच रिस्टार्ट होईल. अर्थातच या अपडेटसाठी तुम्हाला अजून आठवडाभर प्रतिक्षा करावी लागणार आहे.
अँड्राईड 4.4.4 किटकॅट हे अपडेट भारतात सर्वात आधी मोटोरोलाच्या मोटो जी, मोटो ई आणि मोटो एक्स फोनधारकांनाच मिळणार आहे. म्हणजेच अँड्राईडचं नवीन अपडेट उपलब्ध झाल्यानंतर भारतातील सर्वात अपग्रेडेड फोन हे फक्त मोटोरोलाचेच असतील.
ABP Majha